नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहे व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे त्यामुळे दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
दहावीची परीक्षा 26 मार्च पर्यंत होती व ती परीक्षा आता संपलेली आहे, त्यामुळे आपला निकाल नेमका काय लागणार याबाबत मुलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तसेच आपला निकाल चांगला लागावा अशाप्रकारची इच्छा प्रत्येक विद्यार्थ्यांची आहे.
दहावी बारावीचा रिझल्ट नेमका कधी लागणार या बाबत नेमकी घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे आपण रिजल्ट कधी लागेल याबाबतचा अंदाज घेणार आहोत. परीक्षा संपलेल्या असल्याने आता मूल्यमापन प्रक्रिया चालू होणार आहे.
आपण दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागणार याचा अंदाज कसा काढणार तर गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये दहावी बारावीचा रिझल्ट किती तारखेला तसेच कोणत्या कालावधीमध्ये लागलेला आहे व त्यानुसार 2024 ता रिझल्ट कधी लागणार याचा अंदाज काढला जाऊ शकतो.
2020 पासून ते 2023 पर्यंत लागलेल्या रिझल्टच्या तारखा नुसार, 29 जुलै, 16 जुलै, 17 जून, 2 जुन या तारखांना रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेले होते,व त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यामध्ये दहावी बारावीचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे.