मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत झालेले नुकसान शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस झालेला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 2023 च्या या हंगामामध्ये Ativrushti Nuksan सहन करावे लागले होते. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना अजून पर्यंत नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेले नसल्यामुळे आता येणाऱ्या हंगामामध्ये त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे या Ativrushti Nuksan Bharpai साठी महाराष्ट्र शासनाने नुकताच शासन निर्णय काढून 200 कोटी 75 लाख रुपये इतका निधी वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे.
या शेतकऱ्यांना मिळेल मदत:
हे 200 कोटी 75 लाख रुपये इतकी रक्कम ज्या शेतकऱ्यांचे नुकसान मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. नुकसान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि शासन दरबारी नुकसान म्हणून त्यांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे.
महाराष्ट्र ऑक्टोबर या कालावधीत राज्यात झालेल्या नुकसानी पोटी अतिवृष्टी व पुर यामुळे झालेल्या नुकसानीची रक्कम वाटपासाठी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे नुकसान भरपाईच्या निधीच्या मागणीचे प्रस्ताव पाठवले होते.
Nuksan Bharpai वाटपाच्या निकषानुसार ज्या महसूल मंडळांमध्ये 24 तासात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे असे शेतकरी या माहितीसाठी पात्र असतील. ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निकष लागू राहणार नाही.
संबंधित लाभार्थ्यांना Nuksan Bharpai Vatap केल्यानंतर त्याची यादी जिल्हास्तरावर जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावी अशा सूचना शासन निर्णय देण्यात आलेले आहे.
जर तुम्हाला हा निधी वाटपाचा शासन निर्णय पाहायचा असेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. तो शासन निर्णय सविस्तर वाचून तुम्ही या नुकसान भरपाई वाटपासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊ शकतात.
वर शासन निर्णयाची लिंक दिलेली आहे, त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई चे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. हे पैसे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या गाव निहाय यद्या येतील, त्या नंतर संबंधित शेतकरी बांधवांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.