बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपये, जे बांधकाम कामगार नोंदणी म्हणून सक्रिय असेल अशा बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळणार आहे परंतु त्यासाठी अर्ज करावा लागनार, कारण बांधकाम कामगारांना त्यांच्या कामासाठी हत्यारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.
बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळवण्यासाठी काही अटी व शर्ती देण्यात आलेले आहे त्यामध्ये बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षा दरम्यान असावे. तसेच बांधकाम कामगाराकडे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असावी. बांधकाम कामगार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
बांधकाम कामगारांना लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- जन्म प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करा, त्यानंतर रिन्यूअल दिनांक टाका.
तसेच नूतनीकरण दिनांक व आवक दिनांक टाकावा, आधार क्रमांक व नोंदणी क्रमांक टाका.
त्यानंतर अर्ज करायचे वैयक्तिक माहिती भरावी लागणार त्यामध्ये नाव, गाव, पत्ता तसेच इतर प्रकारची माहिती मोबाईल क्रमांक टाकावा.
त्यानंतर अर्जदाराचा बँक तपशील भरावा, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, शेवटी हमीपत्र जोडावे.अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी.
90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर सह सहाय्यक उपकरणे, आत्ताच अर्ज करा