आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या योजना केंद्र सरकार अंतर्गत तसेच विविध राज्य सरकार अंतर्गत राबविल्या जातात, अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच सुरक्षित पैसे ठेवण्यासाठी बँक खाते उघडले जाते, परंतु एक व्यक्ती किती बँक खाते उघडू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बँक खाती उघडली जातात तर काही व्यक्तींची मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या बँकांमध्ये खाती असतात. तसेच गरजेनुसार विविध प्रकारची खाती उघडली जाऊ शकते लहान मुलांना सुद्धा खाती उघडता येतात कारण स्कॉलरशिप सारख्या शैक्षणिक योजनांमधून मुलांना लाभ दिला जातो तसेच शासन अंतर्गत मुलांसाठी योजना राबविल्या जातात.
भारतात एखादी व्यक्ती किती बँक खाते उघडू शकते याचे उत्तर म्हणजेच आरबीआय चा कोणताही असा नियम नाही, त्यामुळे देशातील एक व्यक्ती कितीही खाते उघडू शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बंधन खाती उघडण्यावर नाही.
अतिवृष्टी अनुदान वाटपास सुरुवात, अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच हे काम करा