मित्रांनो रेशन दुकान म्हटले की आपल्यासमोर केवळ स्वस्त धान्य दुकान असे चित्र उभे राहते. परंतु आता रेशन धान्य दुकानांमध्ये साड्या सुद्धा मिळणार आहे. या रेशन धान्य दुकानांमध्ये मोफत साडी वितरण करणारी योजना राबविण्यात येत आहे. परंतु ही योजना काय आहे या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना मोफत साडी मिळणार केव्हा मिळणार या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
या तारखेपासून मिळणार मोफत साड्या:
1 फेब्रुवारी 2024 पासून राज्यातील रेशन धान्य दुकानांमध्ये मोफत साड्या वितरण करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या साड्यांचे वितरण कॅप्टन मार्केट योजना या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. चला जाणून घेऊया captive market yojana बद्द्ल विस्तृत माहिती.
ही मोफत साडी वितरण योजना वस्त्रोद्योग विभाग राबवित आहे. परंतु साडी चे वितरण रेशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी जिल्हा निहाय सूचना देण्यात आलेल्या आहेत.
किती वेळ मिळणार साड्या?
captive market yojana योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच वर्ष मोफत साड्या वाटप करण्यात येणार आहे. योजना संदर्भातील जीआर 10 ऑक्टोबर 2023 रोजी काढण्यात आलेला होता. योजना 2023 ते 28 या पाच वर्षाकरिता राबवली जाणार आहे.
मोफत साडी कुणाला मिळणार?
या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्या प्रत्येक कुटुंबातील महिलांना ही साडी वाटप करण्यात येणार आहे. 355 रुपये किमतीची ही साडी असणार आहे एका वर्षामध्ये एकदाच या साडीचा लाभ मिळणार आहे. सर्वांना मोफत साडी मिळणार आहे.