पुढील 2 दिवस राज्यातील या भागात तुफान पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो सावध व्हा! हवामान विभागाचा इशारा | Chance Of Rain

मागील एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आल्याने सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडालेली आहे, अचानकच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला व त्यामुळे शेती पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत काढणीवर आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

 

ज्वारी व बाजरी सारखी पिके पाऊस व वाऱ्यामुळे भुई सपाट झालेले असते, व अशा स्थितीमध्ये अजूनही पुढील दोन ते तीन दिवस अशाच प्रकारचे पावसाचे वातावरण राज्यामध्ये असणार आहे कारण 29 तारखेला मराठवाडा सह विदर्भामध्ये अवकाळी पावसाने तारांबळ उडालेली आहे.

 

नाशिक, धुळे,नंदुरबार, यवतमाळ, परभणी, वाशिम, अकोला या भागांमध्ये धो धो पाऊस बरसलेला आहे तसेच हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.

 

एवढेच नाही तर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे परंतु अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सावध होऊन आपल्या शेती पिकाची काढनी लवकरात लवकर करून घेणे योग्य ठरेल.

अधिक माहिती साठी येथे बघा