कापसाचे नवीन वाण आले! कृषी क्षेत्रातील वैज्ञानिकांनी तयार केले नवीन वाण, जोरदार पीक जास्त उत्पन्न | Cotton Farming

शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाचा विचार केल्यास जगभरामध्ये जेवढा कापूस पिकतो त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. भारतात सर्वात जास्त कापसाची जमीन लागवडीखाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कापूस पिकावर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून कापसाला मिळणारा भाव व वेळेवर कापसामध्ये गुलाबी बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव पाहता शेतकरी सध्या संकटात दिसतो.

 

राज्यातील धुळे तसेच नंदुरबार त्याचबरोबर यवतमाळ मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक पिकवले जाते. कापसाचे एकरी उत्पादकता कमी झाल्यामुळे तसेच अपेक्षित भावना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आता कृषी विज्ञान आणि नवीन कापसाच्या वाणाची निर्मिती केलेली आहे.

 

कापूस संशोधन करणाऱ्या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रासाठी खास मेडिकेटेड कापूस वान तयार केलेले आहे. या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापसाचे वाण इतर सामान्य वाणापेक्षा 25% प्रमाणात जास्त पाणी शोषून घेते. या कापसाचे वेचणी केल्यानंतर यावर प्रक्रिया केल्या जाते, नंतर हा कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतो.

 

 

सध्या हे कापूस व्यावसायिक स्तरावर लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या लागवडीसाठी देखील हे वाण वापरता येणार आहे. या कापसाला इतर कापसाच्या तुलनेत चांगला दर महिन्याची शक्यता आहे. हा कापूस आपल्या साधारण कापसापेक्षा जास्त प्रमाणात पांढरा असतो तसेच आखूड धागा कापसाचे हे वाण समजले जाते.

 

कापसाचे हे वाण हलक्या जगण्यासाठी तसेच कोरडवाहू जमिनीसाठी देखील उपयुक्त राहणार आहे. या कापसाच्या वनाच्या कालावधी हा 120 दिवस 140 दिवस इतका असणार आहे.

या कापसाच्या जातीची योग्य पद्धतीने लागवड केली तर आम्ही योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले तर हेक्टरी 20 क्विंटल उत्पादन मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

 

या जातीची सघन पद्धतीने लागवड केली तर हेक्‍टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.