शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट येत आहे. शेतकरी मित्रांनो वारंवार कापसाच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे कापसाचे बाजार भाव आता पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे रुपये पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे एवढ्या कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना जर कापूस विकावा लागला तर त्यांनी केलेला खर्च सुद्धा निघणार नाही.
शेतकरी बांधवांना कापसाचा हंगाम सुरू झालेला असताना कापसाला चांगला दर मिळत होता त्यामुळे शेतकरी खुश होते जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यावर्षी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कापसाची लागवडीचे क्षेत्र वाढवले होते. परंतु आता शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरामध्ये आलेला असून शेतकऱ्यांना आता ते विकायचा आहे परंतु सद्यस्थितीमध्ये पाच हजार आठशे रुपये फक्त ते सहा हजार सातशे रुपये पर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
त्याचबरोबर यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झालेले असल्यामुळे दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात कापसाचे उत्पादन पाहायला मिळत आहे उत्पादनात घट झालेली असली तरी सुद्धा कापसाचे बाजार भाव मात्र सातत्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी पेक्षाही यावर्षी कापसाला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी निराश झालेले आहे. दोन वर्षाच्या पुढे कापसाला सरासरी 12 हजार रुपये इतका दर मिळालेला असल्यामुळे शेतकरी खुश होते परंतु गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आणि हीच परिस्थिती आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे यावर्षी कापूस उत्पादक तज्ञांनी सुरुवातीला कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी तेजी लक्षात घेऊन कापसाचे दर चांगले राहतील असा अंदाज देखील वर्तवला होता.
येत्या काळात कापसाचे दर वाढतील की कमी होतील?
शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवलेली आहे कारण की शेतकऱ्यांना एवढ्या कमी दरामध्ये कापूस विक्री करणे परवडत नाही. यावर्षी 7500 पेक्षा जास्त दर न जाता ते तिथून टप्प्याटप्प्याने खाली आलेले आहेत. कापसाच्या सुरुवातीच्या हंगामात असणाऱ्या दरात आणि सध्या सुरू असलेल्या दरात एक हजार रुपयांचा फरक आपल्याला पाहायला मिळत आहे.
अजून देखील हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी शासनामार्फत शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीत. येत्या काळामध्ये लवकरच कापूस हमीभावाने शेतकऱ्यांकडून शासनाने खरेदी करून किमान हमीभाव तरी शेतकऱ्यांना मिळावा.