सिलेंडरचे दर एवढ्या रुपयांनी झाले स्वस्त, बघा किती रुपयांना मिळणार आता सिलेंडर | Cylinder Rate

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली असल्याची माहिती दिली, 1 जून रोजी कंपनीने व्यवसाय गॅस सिलेंडरच्या झालेल्या कपातीसह सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या त्यामुळे व्यावसायिकांमध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण या कपातीमुळे बघायला मिळत आहे कारण आता कमी दरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहे. 

 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही मार्च महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शंभर रुपयांची कपात करण्यात आलेली होती परंतु आता एक जूनला जाहीर करण्यात आलेल्या किमतीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आलेले आहे, कॅलेंडरच्या दरामध्ये साधारणतः 70 ते 72 रूपयांची कपात झालेली आहे.

 

कोणत्या ठिकाणी किती रुपयांची कपात व्यवसाय गॅस सिलेंडर मध्ये झालेली आहे, व ती कपात वगळता आता व्यवसायिकांना किती रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार हे बघूयात, कोलकत्ता या ठिकाणी 72 रुपयांची कपास झालेली असून आता सिलेंडर ला मिळणारा दर 1787 रुपये एवढा आहे. कपात झाल्यानंतर चेन्नई या ठिकाणी 1840 रुपये एवढा दर व्यवसायिक सिलेंडर साठीचा आहे. दिल्ली या ठिकाणी 1676 रुपये एवढा दर व्यवसाय सिलेंडरला मिळतोय. सोळाशे 29 रुपये एवढा दर मुंबई या ठिकाणी मिळालेला आहे.

 

अशाप्रकारे कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील प्रमाणे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली आहे व त्यामुळे आता काही रुपये कमी देऊन सुद्धा सिलेंडर व्यवसायिकांना उपलब्ध होईल.

 

खाद्यतेलांच्या किमतीत एवढ्या रुपयांची घसरण, बघा खाद्य तेलाचे नवीन दर