दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित, अनुदानाचे वितरण कधी केले जाणार? शेतकऱ्यांनो हे काम पूर्ण करा | Drought Grant

खरीप हंगाम 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला होता अशा परिस्थितीमध्ये पावसाची गरज असताना सुद्धा पाऊस न आल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते व अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणे गरजेचे आहे कारण राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती व लवकरच अनुदान सुद्धा दिले जाईल याची घोषणा करण्यात आलेली होती परंतु अद्यापही दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना दिले गेलेले नाही.

 

दुष्काळी अनुदानाचे वाटप करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु त्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया लांबली जात आहे परंतु शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदान मिळवण्यासाठी सर्वप्रथम ई केवायसी करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ई केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचे लाभ दिले जाणार नाही.

 

तुम्ही ई केवायसी केल्यानंतर व तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण केले जाणार आहे तसेच पोर्टलवर शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा अपलोड करण्याचे काम चालू झालेले असून अशा शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी अनुदान मिळणार आहे.

हळदीच्या दरात मोठी घसरण, विविध बाजार समितीतील आजचे हळद दर