1980 पासुन चे जुने सातबारा, उतारा, फेरफार बघता येणार मोबाइल वर | Ferfar Utare

जर एखाद्या वेळेस जमिनीची खरेदी करायची असेल तर त्यावेळेस त्या जमिनीचा इतिहास, जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे कारण जमिनीच्या इतिहासावरून कोणाच्या नावावर किती वेळ जमीन होती त्यानंतर कोणाच्या नावावर झाली अशा प्रकारची संपूर्ण माहिती जमिनीचा इतिहास ग्राहकाला माहीत होतो व त्यामुळे जमीन विकत घेतल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासत नाही.

 

ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरून जुने सातबारा उतारा, फेरफार बघण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा

 

सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

 

त्यानंतर ही रेकॉर्डिंग ऑप्शन वर क्लिक करून, त्यानंतर तुमची असलेली भाषा निवडा व त्यानंतर नोंदणी पर्यावर क्लिक करून माहिती भरा,व नोंदणी करा.

 

नोंदणी करताना तुमचे संपूर्ण नाव, तुमचे गाव, पत्ता, पिन कोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल त्यानंतर नोंदणी करावी व मिळालेला युजर आयडी व पासवर्ड टाकावा.

 

त्यानंतर तुम्हाला अगदी सहजरीत्या उत्तर देता येईल अशा प्रकारची तीन ते चार प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे द्या व केपच्या कोड बॉक्स मध्ये टाकावा.

 

तसेच पुढे सुद्धा काही स्टेप फॉलो कराव्या लागतील व विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा व त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला जुनी कागदपत्रे म्हणजेच सातबारा उतारा फेरफार दिसणार आहे.

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, एका व्यक्तीला एवढी खाती उघडता येणार