शेतकऱ्यांनो अशा पद्धतीने ओळखा रासायनिक खतांमधील भेसळ | fertilizers 

शेतकऱ्यांची खरीप हंगामातील लागवडीची पूर्वतयारी म्हणजेच मशागतीची तयारी चालू झालेली असून अगदी काही दिवसांमध्ये आता पेरण्या सुद्धा पूर्ण होतील मान्सून अगदी जवळ येऊन पोहोचणार आहे अशा कारणाने लवकरच आपल्या भागांमध्ये सुद्धा मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची घाई सुरू होईल अशा स्थितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात, शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करतात व रासायनिक खते खरेदी करतात परंतु आता रासायनिक खतांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस भेसळ केली जात आहे त्यामुळे शेतकरी फसला जाऊ नये या कारणाने कोणत्या खतांमधील भेसळ कशा पद्धतीने ओळखायची याची ट्रिक शेतकऱ्यांनी अवश्य जाणून घ्यावी.

 

बनावट खत ओळखण्याची पद्धत

 

युरिया

 

आपल्याला तर माहीतच आहे की युरियाचा पर्श थंड असतो तसेच युरिया गोलाकार व पांढरा शुभ्र असा असून चमकदार असतो युरिया बनावट आहे की नाही हे ओळखण्यासाठी शेतकऱ्यांनी एका छोट्या कढईमध्ये युरियाची दाणे टाकावी कढई गरम झाल्यानंतर जर तो युरिया वितळला नाही तर तो युरिया बनावट आहे आणि कढई गरम झाल्यानंतर युरियाचे पाणी झाले असता किंवा तो वितळले असता तो युरिया खरा आहे.

 

डीएपी

 

डीएपी बनावट आहे का हे ओळखण्यासाठी त्यामध्ये थोडा चुना टाकून मॅश करावे त्यानंतर जर त्याचा वास घेणे सहन झाले नाही तर तो खरा आहे, आणि दुसरी पद्धत म्हणजे डीएपी चे दाणे नखाने तोडण्याचा प्रयत्न करा जर दाणे तुटले तर तो बनावट आहे.

 

अशाप्रकारे शेतकऱ्यांना खतांमध्ये झालेली भेसळ म्हणजेच बनावट ओळखता येणार आहे कारण खताचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे व शेतकऱ्यांना इलाज आहे या दरामध्ये खताची खरेदी करावी लागते परंतु अशा स्थितीमध्ये बनावट खते देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते ही फसवणूक थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

 

उन्हाळी पिकांची ई पिक पाहणी केलीत का? ई पिक पाहणी सुरू, लगेच हा ॲप डाऊनलोड करा