या महिलांना मिळत आहे मोफत साडी, तुम्ही अर्ज केला का? अशी मिळवा मोफत साडी | Free Sadi Scheme

शासनांतर्गत एक निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक नागरिकांच्या कुटुंबामध्ये प्रतिवर्षी एक साडी देण्याचा निर्णय असून, 26 जानेवारी पासून ते 24 मार्च या कालावधीमध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साडीची वाटप केली जाईल.

 

राज्यातील अंतोदय शिधापत्रिकाधारकांना कॅप्टिव्ह योजनेअंतर्गत पॉस मशीन द्वारे प्रतिकूटुंब एक याप्रमाणे मोफत साडीचे वाटप केले जाणार आहे तसेच येणारा काळ हा होळी सणाचा आहे त्यामुळे होळी सणा निमित्त महिलांना मोफत साडी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरेल.

 

24 मार्च रोजी होळी असल्याने होळी पूर्वी महिलांना साड्याचे वाटप केले जाईल तसेच पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार 100 साड्या 41 ते 46 किलो वजन दरम्यानच्या असेल. तसेच हाताळणीच्या वेळी साड्यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा साड्या खराब होणार नाही याची काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे अंतोदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रत्येकी एक साडी दिली जाणार.

लग्न करण्यासाठी अनुदान योजना, 25 हजार रुपये मिळणार असा करा अर्ज