राज्यातील या भागात पावसाची शक्यता, तर या भागात होणार गारपीट, या पिकांना धोका | Garpit Shakyata

गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार करायचा झाल्यास राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे तसेच विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे व त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसते, उन्हाळी पिकांमध्ये तीळ, ज्वारी अशा प्रकारची विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

 

हवामान विभागाअंतर्गत राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीटीची शक्यता वर्तवलेली असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, मराठवाडा व विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सावध व्हावे.

 

विदर्भातील या भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

 

विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

अशाप्रकारे हवामान विभागाअंतर्गत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी.

या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा चा दुसरा टप्पा, एवढ्या कोटींचा निधी मंजूर, तुम्हाला मिळणार का?