राज्यात हळदीची लागवड करण्यात येते व सध्याच्या स्थितीमध्ये हळद पीक काढणीला येऊन पोहोचलेले आहे विविध बाजार समितीमध्ये हळदीला चांगल्या प्रकारे दर मिळताना दिसतो तसेच बाजार समितीतील आवक दिवसेंदिवस थोड्या प्रमाणात वाढताना दिसते. तसेच हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केट मध्ये हळदीला 17500 रुपये एवढा दर मिळाला. तसेच सरासरी दर 16250 रुपये एवढा मिळालेला होता.
सध्याच्या स्थितीमध्ये नवीन हळद काढणीला येऊन पोहोचलेले आहे व नवीन हळदीला चांगल्या प्रकारे दर बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. वसमत बाजार समितीमध्ये हळदीला मिळालेला दर 17690 रुपये एवढा मिळालेला होता, तर सरासरी 14290 रुपये एवढा मिळाला. तर पंधरा तारखेला 573 एवढी आवक होती. वीस हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला तर सरासरी दर 15300 एवढा होता.
राज्यातील विविध बाजार समितीमध्ये हळदीची आवक 250 ते 350 क्विंटल एवढी होत आहे, तर हळदीला सरासरी पंधरा हजार रुपये पर्यंतचा दर मिळताना दिसतो विविध बाजार समितीमध्ये हळदीनुसार 17 हजारांच्या पार हळदीला दर मिळत आहे. अशाप्रकारे हळद दराचा विचार करायचा झाल्यास चांगल्या प्रकारे हळदीला दर मिळताना दिसतो.
या शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटीची तरतूद, कापूस सोयाबीन भावांतर योजना सुरू