हळदीला या बाजार समितीमध्ये मिळाला 17 हजारांचा दर | Halad Dar

हळदीला मोठया प्रमाणात मागणी असतें, तसेच राज्यात मोठ्याप्रमाणात हळदीची लागवड केली जाते, परंतू राज्यात मात्र हळदीला गेल्या पाच वर्षांपासून दर योग्य मिळतं नसल्याने शेतकऱ्यांनी हळदीची साठवणुक केलेली होती, अशा परिस्थितीमध्ये यावर्षी मात्र हळदीला चांगला दर मिळत आहे.

 

वाशिम मध्ये पुर्वी हळद खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्यांना मात्र हिंगोली मधे नेऊन विकवी लागत होती. तेव्हा मात्र जास्त आवक झाल्यास शेतकऱ्यांना कमी दर मिळायचा,परंतु आता मात्र वाशिम बाजार समितीमध्ये हळदीची खरेदी केली जात आहे.

 

वाशिम येथील रिसोड बाजार समितीमध्ये 9 मार्च रोजी हळदीला मिळालेला दर 17 हजार 151 रुपये एवढा मिळाला. त्यामूळे हळद उत्पादकांमधे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी हळदीला चांगला दर न मिळाल्याने हळदीची साठवणूक केलेली होती. त्यामूळे यावर्षी शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामूळे हळद उत्पादक हळदीची चागल्या दरात विक्री करत आहे.

 

हळदीला चागल्या प्रमाणात दर मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे हळदीला चागल्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे, तसेच सौंदर्य प्रसाधने यांमध्ये हळदीचा वापर करावा लागतो, या मुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लग्न सराईच्या काळात सोने महागले! सोन्याचे दर गरीबांना रडवणार, बघा आजचे सोन्याचे दर

कापसाचे दर 9 हजार पार! या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वोच्च दर, आजचे दर पहा