हळद उत्पादक शेतकरी होणार मालामाल, सोयाबीन दराची वाईट अवस्था | Halad Soyabin Dar

राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी हळद उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी हळद मालामाल करणार आहे, विविध बाजार समितीमध्ये हळदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला मिळालेला दर हा चांगल्या प्रमाणात होता त्यामुळे यावर्षीच्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली होती अशा शेतकऱ्यांना हळदीचे उत्पादन मालामाल करून सोडणारे आहे कारण हळदीचे दर तर सर्व पिकापेक्षा चांगल्या प्रमाणात आहे.

 

हळदीचे दर 15000 पार

 

हिंगोली जिल्ह्यातील बसमत बाजार समितीमध्ये हळदीला मिळालेला दर 15390 रुपये एवढा होता. तर सरासरी दर 11195 रुपये एवढा होता. तसेच नांदेड बाजार समितीमध्ये हळदीची झालेली आवक 728 क्विंटल होती. 14,795 एवढा हळदिला मिळाला तसेच सरासरी दर 13105 रुपये एवढा दर मिळाला. तसेच हिंगोली बाजार समितीमध्ये 15000 एवढा दर मिळाला. सरासरी 13950 रुपये मिळाला तर बाजार समितीतील आवक एक हजार क्विंटल एवढी होती.

 

सोयाबिन बाजार भाव

 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते परंतु या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णतः घाट्यात आलेले आहे कारण सोयाबीनला हवा त्या प्रमाणात दर मिळत नाही तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्च सुद्धा निघणारा नाही आहे तसेच सध्याच्या स्थितीमध्ये बाजार समितीतील सोयाबीनचे दर ज्या अवस्थेमध्ये आहे तर वाढणार की नाही याची शक्यता सुद्धा सांगता येणार नाही.

 

यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेला दर 4650 रुपये एवढा आहे तर सरासरी दर 4630 एवढा मिळत आहे. परंतु इतर बाजार समितीचा विचार केला असता हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी बाजार समितीमध्ये मिळालेला दर 4612 रुपये एवढा असून सरासरी दर 4556 रुपये एवढा होता. अशाप्रकारे सोयाबीनला दर मिळत आहे.

नवीन हरभऱ्याची आवक होताच, हरभऱ्याच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण