हरभरा बाजारभावात झाली घट, आजचे हरभरा बाजारभाव पहा | Harbhara Bajarabhav

सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समिती हरभऱ्याला काय दर मिळत आहे हे आपण जाणून घेणार आहोत, तसेच हरभऱ्याच्या दरात घट झालेली आहे का विविध राज्यांमध्ये हरभऱ्याच्या दर काय आहे व महाराष्ट्रातील हरभऱ्याला काय दर मिळत आहे याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच हरभऱ्याची आवक कमी झाली की वाढली कशाप्रकारे आहे हे संपूर्ण माहिती आपण घेऊया.

 

यावर्षी केंद्र शासना अंतर्गत हरभऱ्याचा हमीभाव 5440 रुपये एवढा ठरवण्यात आलेला आहे. तर काही बाजार समितीमध्ये हमीभावा इतका दर मिळताना दिसतो, परंतु महाराष्ट्र, राज्यस्थान तसेच मध्य प्रदेश चा विचार करायचा झाल्यास विविध बाजार समितीमध्ये काही ठिकाणी हमीभाव पेक्षा कमी दर हरभऱ्याला मिळताना दिसतो.

 

हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी मात्र चिंतीत झालेले असून हरभरा पिकाला विकावा की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, मध्यप्रदेश मधील काही बाजार समितीमध्ये मिळालेला हरभऱ्याचा दर 5 हजार 100 ते 5 हजार 300 रुपये एवढा होता.

 

राजस्थानमध्ये मिळालेला दर 5 हजारापासून ते 5 हजार 300 रुपये पर्यंत झाला, तर महाराष्ट्रामध्ये 5 हजार 100 ते 5400 रुपये एवढा मिळालेला होता. अशाप्रकारे राज्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा वरील प्रमाणे दर मिळताना दिसतो.

या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 कोटी 22 लाखांची रक्कम जमा होण्यास सुरुवात