या ठिकाणी हरभरा दर 10 हजारांच्या उंबरठ्यावर, बघा विविध बाजार समितीतील हरभरा दर | Harbhara Dar

रब्बी हंगामामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड केली जाते, परंतु यावर्षी हरभऱ्याला काय दर मिळत आहे हे जाणून घेणे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक आहे, दिवसेंदिवस हरभराच्या जातींमध्ये सुद्धा फरक पडत आहे, विविध प्रकारच्या जातींच्या हरभऱ्यानुसार वेगवेगळा दर हरभऱ्याला मिळताना दिसतो, तर राज्यातील जळगाव बाजार समितीमध्ये बोर्ड जातीच्या हरभऱ्याला 9975 रुपये एवढा दर मिळाला.

 

चिखली बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5575 रुपये एवढा होता, तर सरासरी दर 5388 रुपये एवढा मिळाला. बाजार समितीतील हरभऱ्याची आवक 1178 क्विंटल एवढी होता. दिग्रस बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5450 रुपये एवढा होता. तर सरासरी दर 5415 रुपये एवढा मिळाला.

 

यावल बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5700 रूपये एवढा मिळाला. सरासरी दर पाच हजार दोनशे रुपये एवढा होता, बाजार समितीतील हरभरा आवक 180 क्विंटल एवढी होती. तुळजापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 5600 रुपये एवढा पाहिला मिळाला, अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये हरभऱ्याला वरील प्रमाणे दर मिळत आहे.

कुसुम सोलर पंप योजना, लाभार्थी यादी जाहीर, मोबाईल वरून कशी पहावी यादी?