सध्याच्या स्थितीमध्ये उन्हाळा चालू आहे व त्यामुळे सर्वसामान्य माणूस चिंतीत झालेला आहे कारण उन्हाळा एवढा तापलेला आहे की नागरिकांना कुलर मध्ये एसीमध्ये असून सुद्धा उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे घरामध्ये उकळल्यासारखे जाणवत आहे व त्यामुळे पावसाची स्थिती यावर्षी देशामध्ये कशी राहणार याबाबतची चिंता सुद्धा शेतकऱ्यांना भासत असेल.
हवामान विभाग अंतर्गत देशातील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे व त्यानुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये देशात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण असेल, तसेच या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागा अंतर्गत व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये सध्या स्थितीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु पावसाळ्यामध्ये पावसाची स्थिती कशी असेल त्यावरून शेती पिकाचे भविष्य अवलंबून असणार आहे वरील बातमीनुसार शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला असेल की चांगला पाऊस पडणार आहे.
तसेच हवामान विभागाअंतर्गत पुढे सुद्धा मान्सूनच्या आगमनाची तसेच राज्यातील व देशातील पावसाबाबतचे अंदाज विविध प्रकारे दिले जातील व ते अंदाज सुद्धा जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.