राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचे शक्यता, बघा हवामान अंदाज | Havaman Andaj

हवामान विभाग अंतर्गत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे व त्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार याचा फटका कोणत्या जिल्ह्यांना मिळणार कारण, अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती व अशा lपरिस्थितीमध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले असून बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे.

 

काही भागांमध्ये उन्हाचा चटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावत आहे तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंतीत झालेले आहे कारण उन्हाळी पिके शेतामध्ये असल्याने अवकाळी पाऊस आल्यास भुईसपाट होण्याची शक्यता आहे. रविवारला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर खानदेशामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

 

या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

 

नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली नाशिक, धुळे इत्यादी तर मुंबई रायगड रत्नागिरी व ठाणे उष्णतेच्या लाटाची शक्यता वर्तवलेली आहे. अशाप्रकारे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर जमीन, बघा कसा मिळणार लाभ?