शेतकरी बांधवांनो बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर पासून ते विशाखापट्टणम या किनारपट्टीपर्यंत चक्राकार वारे निर्माण झालेले असून यामुळे सौम्य प्रमाणात कमी दाब क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ खास करून पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. हवामान अंदाज या संदर्भातील एक छोटीशी माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवांनो हवामान अंदाज बरोबरच या राज्याच्या काही भागात, 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. हा हवामानाचा अंदाज आयएमडी ने वर्तवलेला आहे. शेतकरी मित्रांनो या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे खरीप हंगामातील अनेक शेती पिकांना धोका निर्माण होत आहे त्यामुळे हे पाऊस येण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
या भागात यलो अलर्ट जारी:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यांना इशारा आहे त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील अकोला तसेच अमरावती त्याचबरोबर वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया तसेच चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील परभणी तसेच जालना आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे.
हा पाऊस विजांच्या कडकडाटासह तसेच जोरदार वाऱ्याच्या सोबत हलका व मध्यम स्वरूपाचा असणार आहे. वरील जिल्ह्यांच्या बरोबरच उर्वरित मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांना देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा फटका बसणार आहे. असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
केव्हा पडणार हा पाऊस?
हा पाऊस प्रामुख्याने 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालेले असून विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. तसेच किमान तापमानामध्ये देखील घट आपल्याला पाहायला मिळत आहे.
शेतकरी बांधवांना कृषी सल्ला:
शेतकरी मित्रांनो सध्या चना हे पीक काढणी करीता येत असून अनेक भागात हे पीक फुलोऱ्यावर आहे, त्यामुळे या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. या व्यतिरिक्त खरीपातील सर्वच पिकांना हा पाऊस फटका बसणारा असून शेतकरी बांधवांनी हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या पिकांची काळजी घेण्याकरिता योग्य ती पावले लवकरात लवकर उचलावी.
काही भागात हा पाऊस जोरदार स्वरूपाचा असेल तर काही भागात कमी स्वरूपाचा असेल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती निगराणी करून घ्यावी.