रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, शासनाच्या वतीने आता रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून घरी धान्य नेण्यासाठी कापडी पिशव्या दिल्या जाणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना धान्य घरी नेण्याची कोणत्याही प्रकारे अडचण भासणार नाही.
अंतोदय शिधापत्रिका धारकांना वर्षातून एकदा साडी दिली जाणार आहे व ती साडी मोफत दिली जाणार असून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वर्षातून दोन वेळा म्हणजेच सहा महिन्यातून एक वेळा अशा कापडी पिशव्यांचे वाटप रेशन धान्य दुकानांमधून केली जाईल.
ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड असेल अशांना कापडी पिशवीचा लाभ घेता येणार परंतु ज्यांनी रेशन कार्ड मध्ये अजूनही नाव टाकलेले नाही अशांनी लवकरात लवकर रेशन कार्ड मध्ये नाव टाकून घ्यायला हवे कारण शासनाअंतर्गत धान्य, साड्या तसेच कापडी पिशवी अशा प्रकारचा लाभ मिळू शकतो.
शासनाच्या अंतर्गत रेशन धान्य दुकानांमध्ये पिशव्यांचा पुरवठा करण्यात येईल त्यानंतर रेशन धान्य दुकानदाराकडून रेशन कार्डधारकांना वर्षातून दोन वेळा कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.
मोफत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन करिता या तारखे पर्यंत अर्ज करा, असा करा अर्ज