राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की पुढील काळात कापसाचे दर वाढतील का? महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. गेल्या वर्षीपासून यांही वर्षीचा विचार केला असता कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे पुढील काळात कापसाचे दर कसे राहील यावरून शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झालेले आहे. कापसाचे दर वाढणार नाही या अंदाजापोटी अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची विक्री केलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची साठवणूक केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र अजूनही कापसाची साठवणूक करावी का? हा प्रश्न पडलेला आहे.
कापसाच्या दराचा विचार केला असता, गेल्या आठ दिवसांपासून कापसाच्या दरात थोड्या प्रमाणात सुधारणा झालेली दिसते, व यामुळे एक प्रकारची आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापूस दरवाढीबद्दल निर्माण झालेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये राज्यात 7500 रुपये पर्यंत कापसाला दर मिळत आहे.
कापूस तज्ञांचे मत काय?
कापूस तज्ञांच्या मते गेल्या दोन ते तीन आठवड्याचा विचार केला असता कापसाच्या दरामध्ये तब्बल दहा टक्के एवढी वाढ झालेली दिसते, तसेच मे महिन्यामध्ये या दरात आणखी पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ञांच्या मते वर्तवली जात आहे, व यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापसाची साठवणूक केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज कापूस तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तुरीचे दर वाढले की कमी झाले? बघा विविध बाजार समितीतील आजचे तूरीचे दर