विवीध बाजार समितीतील आजचे कापुस बाजार भाव, बघा संपुर्ण माहिती | Kapus Bajar Bhav

देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते, परंतु यापूर्वी मात्र मोठ्या प्रमाणात कापसाच्या दरामध्ये घसरण झालेली होती त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस उत्पादन घेणे परवडत नव्हते परंतु सध्याच्या आठ दिवसांचा विचार केला असता विविध बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात चढ पाहायला दिसते, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

देशातील विविध राज्यांमध्ये कापसाला काय दर मिळत आहे, यावरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस विकावा की नाही हे ठरवता येऊ शकते, अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये बाजार समितीमधील कापसाचे दर या संबंधीची संपूर्ण माहिती बघूयात.

 

महाराष्ट्र राज्यातील भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7200 रुपये एवढा होता, तर सरासरी दर 6800 रुपये एवढा बघायला मिळाला. राज्यातील अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला सर्वाधिदर 7200 रुपये होता, तर सर्व साधारण 7159 रू एवढा आहे. तसेच अकोला बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7850 एवढा होता तर सर्वसाधारण दर 7675 रुपये एवढा मिळाला.

 

देशातील गुजरात राज्यातील विविध बाजार समितीतील कापसाचे दर बघूयात, गुजरात मधील राजकोट बाजार समितीमध्ये मिळालेला कापसाला दर 8000 रुपये एवढा होता, तर सर्व साधारण 7650 रुपये एवढा होता. बबरा बाजार समितीमध्ये 8060 रुपये एवढा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर 7280 रुपये एवढा होता.

 

कर्नाटकातील चित्रदुर्ग बाजार समितीमध्ये मिळालेला कापसाला दर 6410 रुपये एवढा दर मिळाला तर सर्वसाधारण दर सहा हजार 385 रुपये एवढा होता. ओडिसातील रायगडा बाजार समितीमध्ये 7020 एवढा दर मिळाला.

 

अशाप्रकारे देशातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळत आहे व विविध बाजार समिती मधील कापसाची आवक सुद्धा वेगवेगळी आहे.

तुरीचे दर वाढले की कमी झाले? बघा विविध बाजार समितीतील आजचे तूरीचे दर