कापसाच्या दरात वाढ, विवीध बाजार समितीतील आजचे कापूस दर | Kapus Bajar Bhav 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते, तसेच गेल्या पंधरा दिवसांचा विचार करायचा झाल्यास कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होताना दिसते परंतु कापसाच्या दरात वाढ होणार नाही या भीती पोटी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केलेला होता व त्यामुळे विक्री केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता पसतावण्याची वेळ येऊन पडलेली आहे कारण सध्याच्या स्थितीमध्ये सात ते आठ हजार रुपये एवढा दर कापसाला मिळत आहे.

 

राज्यातील विविध बाजार समितीत कापसाला काय दर मिळत आहे तसेच विविध बाजार समितीतील कापसाची आवक काय आहे हे जाणून घेऊया.

 

राज्यातील अकोला बाजार समितीचा विचार करायचा झाल्यास कापसाला 7800 रुपये एवढा दर मिळाला. तसेच सरासरी दर 7800 एवढाच मिळत आहे, तर बाजार समितीतील कापसाची आवक 32 क्विंटल एवढी होती. उमरेड बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7320 रुपये एवढा होता तर सरासरी दर 7150 रुपये एवढा मिळाला. बाजार समितीतील कापसाची आवक 620 क्विंटल एवढी होती.

 

सिंधी सेलू बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7650 रुपये होता. तर सरासरी दर 7500 रूपये एवढा होता. 2870 क्विंटल एवढी आवक मध्येच स्टेपल कापसाची झाली. देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 7850 रुपये दर मिळाला, तर सरासरी दर 7500 रुपये होता. बाजार समितीतील आवक 612 क्विंटल एवढी होती.

 

अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7350 होता. सरासरी दर 7300 एवढा होता. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळालेला होता व विविध प्रकारे कापसाची आवक वेगवेगळी होती.

सोयाबीन दराची स्थिती काय? विविध बाजार समितीतील सोयाबिन दर