कापसाच्या दर वाढीस सुरुवात, या बाजार समितीत कापसाला उच्चांक दर | Kapus Bajar Bhav 

देशामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन काढले जाते, परंतु शेतकऱ्यांना मात्र कापसाच्या दरानुसार कापूस उत्पादन परवडणारे नाही कारण मागील काही दिवसांमध्ये कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले होते, हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर कापसाला मिळाला, परंतु शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे कापसाच्या दरात सुधारणा होत आहे, कापसाचे दर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे,

 

बाजार समितीमध्ये कापसाला काय दर आहे यासंबंधीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे तसेच बाजार समितीमध्ये सर्वाधिक मिळालेला कापसाचा दर हा 7500 एवढा होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची विक्री केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

 

या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर

 

विवीध बाजार समितीमध्ये कापसाचे दर वेगळे आहे, बुलढाणा येथील देऊळगाव राजा या ठिकाणी 7500 दर होता तर सरासरी 7200 एवढा होता. या सुधारत असलेल्या दरावरून पुढील काही दिवसात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. नागपूर येथील उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार नऊशे ऐंशी तर सरासरी दर 6750 रुपये होता.

 

मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला सरासरी दर 6500 एवढा होता. यवतमाळ मधील मारेगाव या ठिकाणी मिळालेला जास्तीत जास्त दर 6850 रुपये एवढा होता. तर सरासरी दर 6750 रूपये होता. अशाप्रकारे कापसाच्या दरात थोड्या प्रमाणात सुधारणा होत आहे.

शेतकऱ्यांसाठी शासना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना कोणत्या? बघा संपूर्ण माहिती