कापसाच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ! विविध बाजार समितीतील आजचे कापूस दर | Kapus Bhav

राज्यामध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते तसेच इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनचा कापूस दराचा विचार करायचा झाल्यास कापूस दर खूप कमी होते. व त्यामुळे जेव्हा कापसाचे दर वाढतील अशा वेळेस कापूस विकायचा या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवलेली आहे व गेल्या जवळपास एक महिन्यापासून कापसाचे दर वाढताना दिसतात परंतु जास्त प्रमाणात वाढ न होता आता स्थिर आलेले दिसते.

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर

 

मालेगाव बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7750 रुपये मिळाला, तर बाजार समितीतील सरासरी 7350 रुपये एवढा होता. कापसाची आवक 447 क्विंटल एवढी झालेली होती. घाटंजी बाजार समितीमध्ये 7945 रुपये एवढा दर मिळाला. सरासरी दर 7750 रुपये एवढा मिळालेला आहे.

 

राज्यातील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये तब्बल आठ हजार रुपयांचा दर कापसाला मिळालेला आहे तर सरासरी दराचा विचार करायचा झाल्यास 7800 रुपये एवढा होता. बाजार समितीतील आवक 1216 क्विंटल एवढी बघायला मिळाली.

 

सेलू बाजार समितीमध्ये कापसाला 7795 रूपये एवढा दर मिळाला, तर सरासरी दर 7560 रूपये एवढा होता. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये वरील प्रमाणे कापसाला दर मिळवताना दिसतो.

हरभरा दरात तेजी, विविध बाजार समितीतील आजचे हरभरा दर