कापसाचे दर 8000 पार, विविध बाजार समिती कापसाचे दर | Kapus Bhav

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यावर्षीच्या कापूस दराचा विचार करायचा झाल्यास कापसाचे दर हंगाम सुरू झाल्यानंतर पूर्वी खूप कमी होते, तर सध्याच्या स्थितीमध्ये कापसाच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होताना दिसते त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाचे दर अजून वाढणार अशा प्रकारची आशा निर्माण झालेली आहे.

 

परंतु सध्याच्या स्थितीमध्ये कापसाला दर चांगला मिळत असला तरीसुद्धा या कापूस दर वाढीचा फायदा अत्यंत कमी शेतकऱ्यांना होणार आहे. कारण अत्यंत कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे सध्याच्या स्थितीत कापूस शिल्लक असल्याने त्या शेतकऱ्यांना कापूस दर वाढीचा फायदा होईल. त्यामुळे राज्यातील कापुस दर खालील प्रमाणे जाणून घेऊया

 

विविध बाजार समितीतील कापूस भाव

 

राज्यातील परभणी बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला दर 7850 रुपये एवढा मिळालेला होता. तर सरासरी दराचा विचार करायचा झाल्यास 7750 रुपये एवढा कापसाला दर मिळाला. बाजार समितीतील कापसाची आवक 1275 क्विंटल एवढी होती.

 

वरोरा खांबाड बाजार समितीचा विचार केल्यास 7600 रुपये एवढा दर मिळाला, तर सरासरी दर 7000 रुपये एवढा मिळालेला होता. बाजार समितीतील कापसाची आवक 337 क्विंटल एवढी होती. अकोला बोरगाव मंजू बाजार समितीत कापसाला मिळालेला दर 8009 रुपये एवढा होता तर बाजार समितीतील आवक 54 क्विंटल एवढी होती.

 

मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेले दर 7775 रूपये एवढा होता, तर बाजार समितीतील आवक 3000 क्विंटल एवढी होती,अशा प्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला वरील प्रमाणे दर मिळत आहे.

रेशन कार्डधारकांना मिळणार 2 कापडी पिशव्या, तुम्हाला मिळाल्यात का?