देशातील कापूस दर, अभ्यासकांच्या मते कापसाचे दर कसे राहणार? | Kapus Dar

कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात देशामध्ये घेतले जाते परंतु सध्याच्या स्थितीमध्ये देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाबाबत काय उठा ठेव चालू आहे ते आपण बघूया तसेच पुढील काळामध्ये कापसाचे दर काय राहणार त्याबद्दल अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहेत का? व ते सुद्धा जाणून घेणार आहोत.

 

देशामध्ये कापसाच्या दरात थोड्या प्रमाणात सुधारणा झालेली दिसते. अमेरिका व ब्राझीलच्या कापसामुळे कापसाला फटका बसताना दिसतो, देशातील कापूस बाजारात 50 ते 100 रुपये एवढे दर वाढल्याचे दिसते त्यावरूनच अजूनही दर वाढतील अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

 

गेल्या आठवड्यामध्ये कापसाच्या दरात काही प्रमाणात घट दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झालेले होते. ब्राझीलमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे व येथील उत्पादन जुलै महिन्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, कारण कापसाची काढणी जुलैमध्ये होणार आहे.

 

कापसाची आवक बाजारामध्ये कमी झालेली असताना कापसाला मागणी जास्त आहे, तसेच मे महिन्यामध्ये पाच टक्के एवढा दर कापसाचा वाढण्याची शक्यता तज्ञांच्या मते वर्तवली गेली आहे.

या नागरिकांना मिळते एसटी मध्ये मोफत प्रवास, हे आहेत पात्र लाभार्थी, पहा संपूर्ण माहिती