देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते व सध्याच्या स्थितीमध्ये किंचित शेतकऱ्यांकडे कापसाची साठवणूक करून आहे व त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कापूस बाजारभावाची चिंता लागलेली आहे व त्यामुळे कापसाचे दर सध्या काय चालू आहे कापसाच्या दरात चढ उतारा झालेत का हे आपण बघूयात. तसेच सोयाबीनचे दर सोयाबीनची आवक हे सुद्धा आपण बघणार आहोत.
कापसाच्या दराचा विचार करायचा झाल्यास शंभर रुपयांनी कापसाच्या दरामध्ये उठाव बघायला मिळतो तर कापसाची आवक दिवसें दिवस बाजार समित्यांमध्ये कमी होत आहे व कापसाला मागणी असल्याने कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. 7400 ते 7800 रुपये एवढा दर प्रती क्विंटल प्रमाणे कापसाला मिळताना दिसतो.
सोयाबीन दराचा विचार करायचा झाल्यास हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाचे दर दबावांमध्ये आहे व ते आत्तापर्यंत सुद्धा कायमच असलेले दिसते परंतु या सर्वांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडालेली आहे कारण शेतीवर केलेला खर्च सुद्धा या दराने निघत नाहीये. 4 हजार 300 ते 4 हजार 500 रुपये एवढा दर सोयाबीनला मिळताना दिसतो. तसेच अभ्यासकांच्या मते सोयाबीनच्या दरात असलेली स्थिरता कायम राहू शकते.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 कोटींचा पिक विमा मिळण्यास सुरुवात