कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी कापसाच्या दरात सुधारणा कधी होणार याच्या प्रतीक्षेमध्ये होते पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे कापसाच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहे तसेच या सुधारणेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. कारण मागील काही दिवसांचा विचार केला असता कापसाचे दर सात हजारांच्या आतच बघायला मिळालेले होते, 7000 रुपये एवढा दर सुद्धा कापसाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली होती.
परंतु दिवसेंदिवस कापसाच्या दरात चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहे विविध बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळाला हे बघूयात. देउळगाव राजा बाजार समितीत सर्वाधिक दर कापसाचा बघायला मिळाला,7605 रुपये एवढा सर्वाधिक दर मिळाला. 2423 क्विंटल एवढी आवक झाली. राळेगाव बाजार समितीमध्ये 7350 रूपये एवढा दर मिळाला.
बोरगाव मंजू बाजार समितीत मिळालेला कापसाचा दर 7306 रुपये एवढा होता तर बाजार समितीतील आवक 155 क्विंटल एवढी होती. मारेगाव बाजार समिती 1270 क्विंटल एवढी आवक झाली.7050 रुपये एवढा दर मिळाला.परभणी बाजार समितीत 2150 क्विंटल आवक झाली असून, 7485 रूपये दर मिळाला.
अशाप्रकारे चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे तसेच कापूस अभ्यासकांच्या मते येत्या काही दिवसात पावसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे