कापूस सोयाबीन दराची स्थिती काय आहे? काय म्हणतोय कापूस व सोयाबीनला दर? | Kapus Soyabin Dar

राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु यावर्षी मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतीमध्ये झालेले आहे कारण शेतीवर केलेला खर्च सुद्धा यावर्षी निघालेला नाही, त्यामुळे कापूस सोयाबीनला दर बाजार समितीमध्ये काय मिळत आहे अभ्यासकांच्या मते दरात वाढ होणार का अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात कारण अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस व सोयाबीनची साठवणूक केलेली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मुळातच प्रश्न पडलेला असेल की अजूनही साठवणूक करून ठेवावी की नाही.

 

हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दराचा विचार करायचा झाल्यास सोयाबीनचे दर नरमलेले आहे व अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेली असली तरी अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीनची साठवणूक केलेली आहे कारण कधी ना कधीतरी सोयाबीनचे दर वाढणार अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगलेली होती. सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर कमी जास्त होताना दिसते. 4750 ते 4900 रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळत आहे. सोयाबीन दराची स्थिती अशीच राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे.

 

कापूस दराचा विचार करायचा झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे वायदे नरमलेले असून देशांमध्ये सुद्धा कापसाचे वायदे नरमलेले दिसतात, तसेच कापसाचे दर कमी झालेले असून दरामध्ये स्थिरता निर्माण झालेली आहे व त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले दिसते सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समिती मधील कापसाला मिळत असलेला दर 7300 ते 7700 रुपये एवढा मिळताना दिसतो. अभ्यासकांच्या मते कापूस दरामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे.

हळदीच्या दरात मोठी घसरण, विविध बाजार समितीतील आजचे हळद दर