राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी मिळणार, त्यासाठी महत्वाची बातमी | Kar Mafi

शेती करत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक कर्ज काढतो व अशा वेळेस नैसर्गिक संकट आल्याने ते कर्ज फेडणे शक्य होत नाही व त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली गेलेली होती व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आलेले होते.

 

भाजप शिवसेनेच्या काळामध्ये झालेल्या कर्जमाफीमध्ये शेतकरी पात्र असून सुद्धा 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा कर्ज माफी मिळावी अशा प्रकारची मागणी सतत केली जात होती व अशाच शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसते कारण शेतकऱ्यांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे.

 

2017 मध्ये झालेल्या ज्या शेकर्जमाफी मध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर कर्जमाफी मिळालेली नसेल तर आता मिळू शकते. तसेच राज्यातील 6 लाख 55 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.

शेतकरी मित्रांनो ही एक शक्यता आहे, या बाबत अजून शासकीय अपडेट आलेली नाही. परंतु राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकी लागणार आहे, त्यामुळे या बाबत लवकरच घोषणा केल्या जाऊ शकते.

सोलर पॅनल योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना मिळणार फ्री मध्ये सोलार पॅनल, आत्ताच अर्ज करा