शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते अशा पैकी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे व ती यादी मोबाईल वरून कशा पद्धतीने चेक करायची व त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव आहे की नाही हे कसे बघायचे याविषयी संपूर्ण माहिती बघूयात.
विविध राज्यांमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना राबवण्यात येते व विविध राज्यानुसार योजनेचा लक्षांक सुद्धा देण्यात आलेला आहे, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी हा मुख्य उद्देश योजनेचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महाऊर्जेच्या माध्यमातून योजना राबवली जाते.
योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते व अशांपैकी पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने यादी कशी बघायची हे खालील प्रमाणे बघूयात.
लाभार्थ्यांची यादी अशी चेक करा
लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर राज्याचे नाव सिलेक्ट करा व त्यानंतर तुम्हाला जिल्हा कोणता ऑप्शन देण्यात येईल त्यापैकी तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा व किती एचपी पंपाची यादी बघायची आहे हे सिलेक्ट करा त्यानंतर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही स्वतःचे नाव आहे का ते बघू शकता.
बाल संगोपन योजना, आता प्रत्येक मुलांना मिळणार 2250 रू, असा करा अर्ज