शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी त्यामुळे विहिरी सारख्या पाण्याच्या स्रोतांची उपलब्धता व्हावी याकरिता विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात व त्यातीलच एक योजना, मागेल त्याला विहिरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाखापर्यंतचे अनुदान विहीर खोदण्यासाठी दिली जाते
दरवर्षी राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत पात्र ठरतात व त्यामुळे योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदता येणे शक्य होते, विहिरीच्या उपलब्धतेमुळे पाण्याची सुविधा मुबलक प्रमाणात होते व त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चांगली पिके तसेच ओलिताची पिके सुद्धा काढू शकतो व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा भर पडते.
मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 15 विहिरी देण्यात याव्या अशा प्रकारचे आदेश शासना अंतर्गत देण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत दरवर्षी पंधरा विहिरीला मंजुरी दिली जाईल, व त्यामुळे राज्यात पाच वर्षांमध्ये किमान दहा लाख विहिरी उपलब्ध होऊ शकणार आहे.
रेशन कार्ड धारकांना मिळणार या दिवशी आठ वस्तू, तुम्हाला मिळणार का बघा संपूर्ण माहिती