महाराष्ट्र राज्यांमध्ये महाडीबीटी अंतर्गत विविध प्रकारच्या अनुदान योजना राबविण्यात येत असतात व ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत असलेल्या अनुदान योजना साठी अर्ज केलेला असेल अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कारण महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांची निवड लॉटरी द्वारे करण्यात येत असते व त्यासंबंधीची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे.
विविध प्रकारचे अनुदान संबंधीच्या लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील चार महिन्यापूर्वी अर्ज केलेला असेल अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. महाडीबीटीच्या वेबसाईटवर विविध तारकांच्या लिस्ट जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
या योजनांची लॉटरी पद्धतीने लिस्ट जाहीर
ठिबक सिंचन अनुदान
पॉलिहाऊस अनुदान
सोलर कृषी पंप अनुदान
नर्सरी अनुदान
गाई म्हशी गोटा अनुदान
फळबाग लागवड
शेततळे अनुदान
कृषी यांत्रिकीकरण अनुदान
शेडनेट अनुदान
ऊस तोडणी यंत्र अनुदान
कुकुट पालन अनुदान
कडबा कुट्टी अनुदान
अशा प्रकारचे विविध अनुदान योजनांची लॉटरी लिस्ट बघण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटीच्या वेबसाईटवर जावे लागणार. त्या ठिकाणी तीन लिस्ट बघायला मिळतील त्यानंतर लॉगिन केल्यानंतर इतर लिस्ट सुद्धा मिळतील. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी लिस्ट बघावी.