राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात तसेच महिलांसाठी महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत Sewing machine तसेच पिठाची गिरणी 90 टक्के अनुदानावर देण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत अर्ज मागविले जात आहे त्यामुळे संबंधित इच्छुक महिलांनी अर्ज संबंधित अंतिम तारखेच्या आत भरावेत.
90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलांना काही अटी व शर्ती ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे त्या संबंधित अटी शर्तीमध्ये जर महिला पात्र ठरली तर त्या महिलेला 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन / पिठाची गिरणी देण्यात येईल. त्यासाठी सर्वप्रथम महिलेला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी या महिला पात्र
- पिठाची चक्की योजने करता अपंग महिलांना अर्ज करता येईल तसेच पिको फॉल मशीन साठी इतर महिला अर्ज करू शकतात.
- अर्ज करणारी महिला 17 ते 45 वर्षे या वयोगटातील असावी.
- अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- अर्जदार महिलेने पाच वर्षाच्या आत योजनेचा लाभ पूर्वी घेतलेला नसावा. लाभ घेतलेला असल्यास पात्र ठरवण्यात येणार नाही.
- तहसीलदाराची उत्पन्नाचे प्रमाणपत्र महिलेकडे उपस्थित असावे.
- महिलेला एका वेळी फक्त एकाच योजने करता अर्ज भरता येणार आहे म्हणजेच शिलाई मशीन किंवा पीठ गिरणी या दोन पैकी एकाच साठी अर्ज करता येईल.
अर्ज करण्याचा कालावधी – 9 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी
अर्ज कसा करावा?
अर्ज करताना अर्जदाराकडे संबंधित आवश्यक संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असने गरजेचे आहे अर्ज करताना सर्वप्रथम अर्जाचा नमुना उपलब्ध करून घेणे गरजेचे असून खाली अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे तो सर्वप्रथम डाऊनलोड करावा.
अर्जाच्या नमुन्यांमध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती अर्जदाराला योग्य प्रकारे भरणे आवश्यक असेल अर्ज भरल्यानंतर त्यासोबत जोडायची कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे ती कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे..
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराच्या वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड
- आधार कार्ड
- विज बिलाची प्रत
- बँक पासबुक झेरॉक्स
- अर्जदार महिला अपंग / विधवा / दारिद्र रेषेखालील असल्यास त्याबाबत चे प्रमाणपत्र
अशाप्रकारे वरील संपूर्ण कागदपत्रे तसेच डाउनलोड केलेल्या विहित नमुन्यातील हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी बुलढाणा येथील संबंधित कार्यालयामध्ये सादर करावी.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये