पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये महिना, आत्ताच अर्ज करा | Mandhan Yojana

शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच पीएम किसान मानधन योजना होय, या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हित साधले गेलेलीले आहे कारण शेतकरी जोपर्यंत तंदुरुस्त आहे अशा वेळेस किती ही काम करू शकेल परंतु साठ वर्षाच्या नंतर मात्र त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागू शकते व त्यामुळे, त्यांच्यासाठी पी एम किसान मानधन योजनेअंतर्गत महिन्याला 3 हजार रुपये दिले जातील.

 

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकणार आहेत तसेच शेतकऱ्यांना 55 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत योजनेचा प्रिमिअम भरावा लागेल, हा प्रीमियम शेतकऱ्याला वयाच्या साठ वर्षापर्यंत भरणे गरजेचे आहे व साठ वर्षानंतर महिन्याला 3 हजार रुपये प्रमाणे पेन्शन शेतकऱ्याला चालू होईल.

 

योजनेतील मुख्य बाब म्हणजे जर एखाद्या कारणाने योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पेन्शनचे अर्धे रक्कम म्हणजेच दीड हजार रुपये शेतकऱ्याच्या पत्नीला दिली जाईल, त्यामुळे योजनेचा लाभ कसा घ्यायचा तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती? हे खालील प्रमाणे बघूया.

 

लाभ कसा घ्यावा?

 

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे, लॉगीन बटन वर क्लिक करून विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल, त्यानंतर काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे, त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो अशा प्रकारचे कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावी संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटण वर क्लिक करून अर्ज सादर करावा.

मानधन योजना वेबसाईट: https://labour.gov.in/pmsym

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शासन अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार या सवलती