महाराष्ट्रामध्ये अगदी आठ दिवसाच्या अंतरावर मान्सून दाखल होईल या प्रकारचा अंदाज हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवला जात आहे, कारण अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन झालेले असून आठ ते दहा तारखे दरम्यान महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार मान्सूनचे आगमन होणार आहे, तर हवामान विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दमट वातावरण राहणार आहे.
मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला पोहोचण्याची शक्यता आहे रेमल चक्रीवादळामुळे मानसून जरी लवकर आलेला असला तरी मुंबईमध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला पोहोचणार आहे, त्यानंतर धीम्या गतीने मान्सून उर्वरित भागांमध्ये पोहोचेल. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अर्थातच दहा जून नंतर चांगला मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी तसेच धूळपेरणीची घाई करू नये वधुवर पेरणी मुळातच करू नये कारण यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
राज्यामध्ये तीन जून ते 10 जून या तारखे दरम्यान विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली इत्यादी भागांचा समावेश आहे या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहील.