20 मेंढ्या व 1 मेंढा वाटप योजना, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | Mendhi vatap yojana

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांन अंतर्गत शेळी, मेंढी पालन केले जाते व अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळावी याकरिता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जाते या योजनेअंतर्गत 30 मेंढ्या व एक मेंढा करीता मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

 

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत 45.81 कोटीचा मंजुर करण्यात आलेला आहे तुम्हाला जर या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असणे तसेच तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही योजने अंतर्गत पात्र ठरला तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे.

 

योजने अंतर्गत हे नागरिक पात्र

 

भटक्या जमातीतील नागरिक योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे इतर नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही, त्याबरोबरच महिलांना 30 टक्के एवढे आरक्षण तर अपंगासाठी 3 टक्के एवढे आरक्षण दिले जाईल. मेंढ्यांसाठी 75 टक्के एवढे अनुदान व चाऱ्यासाठी 50 टक्के एवढे अनुदान दिले जातील.

 

योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

 

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • वयाची नोंदणी
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • जमिनीची कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ईमेल आयडी

 

अर्ज कसा करावा?

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्या ठिकाणी वेबसाईट ओपन करून विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागणार आहे तसेच वरील प्रमाणे देण्यात आलेली संपूर्ण कागदपत्रे भरून अर्ज सबमिट करावा.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये महिना, आत्ताच अर्ज करा