देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, त्यातीलच एक योजना म्हणजेच मिनी ट्रॅक्टर योजना होय, महिलांना मिनी ट्रॅक्टर साठी 90 टक्के एवढे अनुदान दिले जाते व लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत महिलांना 90 टक्के अनुदान दिले जाईल परंतु उर्वरित असलेले दहा टक्के अनुदानाची रक्कम महिलेला भरावी लागणार आहे, 3 लाख 15 हजार रुपये पर्यंतची मदत दिली जाणार उर्वरित 35 हजार रुपये महिलेला भरावे लागेल.
या महिलांना मिळणार मिनी ट्रॅक्टर
मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिलांना लाभ दिला जाणार आहे, महिला बचत गटाशी संबंधित असावी बचत गटातील सदस्य 80% अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे, तसेच अध्यक्ष व सचिव सुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीलच असायला हवे.
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायचे असेल तर दिलेल्या ऑप्शन पैकी योग्य पर्याय निवडून अर्ज भरावा लागणार आहे त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती तुमचे नाव, गाव अशा प्रकारची माहिती योग्य प्रकारे भरावी व आवश्यक काही कागदपत्रे अपलोड करावी तसेच अर्ज सबमिट करावा अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दिवसात लॉटरी काढली जाईल त्यामधे तुमचे नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार.
अर्ज करण्याची वेबसाईट – https://mini.mahasamajkalyan.in/
शंभर रुपयांत जमिनीची वाटणी करण्याची कायदेशीर पद्धत, 100रू जमीन नावावर करा हा अर्ज करून