90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर सह सहाय्यक उपकरणे, आत्ताच अर्ज करा | Mini Tractor

महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच एक योजना महाराष्ट्राच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत चालू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर सोबत सहाय्यक उपकरणे देण्यात येते, शेती करत असताना अशा प्रकारच्या ट्रॅक्टर व उपकरणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते अशा स्थितीमध्ये पूर्ण किंमतीत शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही, त्यामुळे 90 टक्के अनुदानावर मीनी ट्रॅक्टरचा लाभ घ्यावा.

 

90 टक्के अनुदान महाराष्ट्र शासना अंतर्गत दिले जाईल परंतु उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागणार आहे शासनांतर्गत 3 लाख 15 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार तर शेतकऱ्याला दहा टक्के रक्कम अर्थातच 35 हजार रुपये जमा करावे लागणार आहे.मिनी ट्रॅक्टर सोबतच इतर उपकरणे मिळवण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे.

 

अर्ज कसा करावा?

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://mini.mahasamajkalyan.in या वेबसाईटवर जावे त्यानंतर विचारले गेलेली संपूर्ण माहिती पूर्ण प्रकारे अर्जदाराला भरावी लागेल अर्ज त्यासोबत खालील प्रकारची आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे शेतकऱ्याला गरजेचे असेल, बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कालावधीनुसार ही योजना अंमलबजावणीत आणल्या जाते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयामध्ये त्याची चौकशी करावी. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक

 

अशाप्रकारे वरील संपूर्ण कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर सह इतर उपकरणे 90 टक्के अनुदानावर हवे असल्यास अर्ज करणे बंधनकारक आहे.

घरगुती गॅस सिलेंडर झाले एवढ्या रुपयांनी स्वस्त , तुमच्या शहरात सिलेंडरचे दर काय असणार? बघा संपूर्ण माहिती