ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, उसाचा FRP 8% वाढवला | Modi Nirnay 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऊस उत्पादकांना आनंद देणारी एक घोषणा करण्यात आलेली असून त्यानुसार उसाचा FRP 8% वाढवला गेलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडे आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.

 

शासन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या घोषणा करण्यात येत असतात व त्यातील ऊस उत्पादकांसाठी केलेली घोषणा यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल 25 रुपये याप्रमाणे दरात वाढ भेटणार आहे. दरामध्ये प्रतिक्विंटल वर 25 रुपये वाढल्याने ऊसाला 340 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे.

 

केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा पाच कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच झालेल्या निर्णयानुसार सुधारित किमती या एक ऑक्टोबर पासून लागु राहतील. सध्याच्या स्थितीमध्ये उसाची किंमत 315 रुपये एवढी आहे तर ती किंमत एक ऑक्टोबर पासून 340 रुपये याप्रमाणे होईल. तसेच या किमती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू राहतील. अशा प्रकारचा हा निर्णय ऊस उत्पादकांना दिलासा देणारा आहे.

पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख फिक्स, या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा होणार