राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात व महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला असता नागरिकांसाठी सुद्धा योजना राबविणे गरजेचे आहे त्यामुळे राज्य शासना अंतर्गत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याची बाब विचाराधीन होती व त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवून एकरकमी 3000 रुपये एवढी देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात बिमाऱ्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये दिव्यांगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, अशा दिव्यांगांना सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता 3000 रूपये वार्षिक डीबीटी द्वारे खात्यामध्ये जमा करण्यात येतील.
योजनेअंतर्गत हे नागरिक पात्र
योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार आहे म्हणजे ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल असे नागरिक. तसेच व्यक्तीकडे आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे असून मिळणाऱ्या तीन हजार रुपयांच्या वार्षिक रखने मधून दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या यंत्रणेची खरेदी करता येणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असू नये.
शंभर टक्के अर्थ सहाय्य राज्यशासना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना योजनेअंतर्गत देण्यात येईल, तसेच नागरिकांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या रकमेमधून आपल्या उपयोगितेनुसार उपकरणांची खरेदी करता येईल त्यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र,ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर,नि-बेस,कमोड खुर्ची, लंबर बेल्ट,फोल्डिंग वॉकर ,सर्वाइकल कॉलर इ.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत इतर कागदपत्रे
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तीन हजार रुपये ची वार्षिक रक्कम मिळेल व त्यातून यंत्रणेची खरेदी करता येणे शक्य होईल. अशाप्रकारे योजनेचा फायदा चांगल्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आहे.
कांदा अनुदान नवीन जीआर आला, आता या शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कांदा अनुदान, विस्तृत माहिती पहा
मित्रानो अशा प्रकारच्या अनेक योजना समाजातील विविध प्रकारच्या घटकासाठी शासन राबवित असते, परंतु सर्व सामान्य नागरिकांना याची माहिती होत नसल्याने त्या योजनांचा लाभ ते मिळवू शकत नाही. ही माहिती महत्वाची वाटत असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.