नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळणार एकत्र, राज्य शासना अंतर्गत निधीचे वितरण | Namo Shetkari Yojana

महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यशासना अंतर्गत नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या धरतीवर राबवण्यात येते या योजनेचा पहिला हप्ता आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे व नमो शेतकरी दुसरा हप्ता कधी वितरित केला जाणार त्याची प्रतिक्षा शेतकरी करत होते व दुसरा हप्ता वितरित केला जावा याकरिता राज्य शासन अंतर्गत 1792 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी अर्थातच डिसेंबर ते मार्च या कालावधीचा हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यास राज्य शासना अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थातच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे व याच तारखेला नमो शेतकरी चा दुसरा हप्ता वितरीत करण्यात यावा याबाबतची तयारी चालू करण्यात आली याबाबतची शक्यता होती, त्यातच आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तीसरा हे दोन्ही हप्ते वितरित करण्याची शक्यता आहे अर्थातच शेतकऱ्यांना आता एकूण सहा हजार रुपये मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख रुपयांचा निधी वितरित