शेतकऱ्यांनो, तुम्हाला नुकसान भरपाई किंवा पिक विमा मिळाला नाही? हे आहे कारण, आत्ताच हे काम करा | Nukasan Bharpai

देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे व शेतकऱ्यांना DBT च्या माध्यमातून पैशाचे वितरण थेट बँकेच्या खात्यामध्ये केले जाते परंतु अशे काही शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई अथवा पीक विमा किंवा इतर प्रकारचे योजनेचे अनुदान जमा झालेले नाही यामागचे नेमके कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत, व समस्या सोडवण्यासाठी काय करावे लागणार हे सुद्धा आपण खालील प्रमाणे बघूया.

 

देशामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यातीलच पीक विमा योजना ही मुख्य असून शेतकऱ्यांना पिक विमा किंवा नुकसान भरपाई अथवा विविध प्रकारच्या योजनांचे अनुदान जमा झालेले नसेल तर त्याचे एक मुख्य कारण म्हणजेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला लिंक नसलेले बँक खाते, शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार कार्ड ला लिंक असलेल्या खात्यावरच डीबीटी च्या माध्यमातून पैशाचे वितरण केले जाते त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे आले असेल तर ते तुम्हाला कसे बघावे लागणार हे सुद्धा पाहूयात.

 

तुमचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक नसल्यास सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यावे. व तुम्ही देखील तुमचे नुकसान भरपाई अनुदान किंवा पीक विमा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच चेक करावा कारण तुमचे संपूर्ण अनुदान डीबीटी अंतर्गत आधार कार्ड संलग्न असलेल्या खात्यामध्ये जमा केलीले जाईल.

 

पिक विमा, नुकसान भरपाई मिळाली किंवा नाही चेक कसे करावे?

 

तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे हे बघण्यासाठी सर्वप्रथम लिंक ओपन करावी.त्यानंतर लॉगिन पर्यावर क्लिक करा व सेंड ओटीपी हे पर्याय निवडा. आलेला ओटीपी रिकाम्या बॉक्समध्ये टाकून बँक स्टेटस हे ऑप्शन निवडा. त्यानंतर ज्या बँकेचे नाव पुढील ठिकाणी दाखवले जाईल ती बँक तुमची आधार लिंक असलेली बँक आहे व त्याच खात्यामध्ये तुमची संपूर्ण अनुदान पीक विमा नुकसान भरपाई चे पैसे जमा होतील.

महिलांना ड्रोन दीदी योजने अंतर्गत 8 लाख रु अनुदान, असा करा अर्ज