राज्यांतील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्यात येईल, यावर्षी म्हणजेच खरीप हंगाम 2023 मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यासाठी 3 हजार 936 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी राज्यातील 22 लाख 34 हजार 934 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत म्हणून वितरित करण्यात येईल.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करताना बहु वार्षिक पिकासाठी हेक्टरी रक्कम ठरवण्यात आलेली आहे, बहुवर्षी पिकांना हेक्टरी 22500 रुपये देण्यात येतील. बागायत पिकासाठी हेक्टरी 17000 रुपये देण्यात येतील. जीरायत पिकासाठी 8500 हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे. त्या बाबतचा शासन निर्णय 29 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे.
बहुवर्षीक पिके तसेच बागायत व जिरायत पिकासाठी हेक्टरी रक्कम ठरवण्यात आलेली आहे त्याबरोबर, नुकसान भरपाई वाटपासाठी तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.
राज्यातील बांधकाम कामगारांना मिळेल 5000 रूपये, सोबत भांडी सुद्धा, अशा प्रकारे अर्ज करा