राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कारण नोव्हेंबर, डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेती पिके मोठ्या प्रमाणात बाधित झालेली असताना, अशा पिकांची नुकसान भरपाई 206 कोटींची मंजूर केलेली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 1 लाख 88 हजार 368 हेक्टर क्षेत्रासाठी 206 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. व त्यानुसार जिल्ह्यातील जिरायत, बागायत, फळपिके यान करिता वेगळा निधी वितरित केला जाईल.
जीरायत साठी प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये, बागायत साठी 27000 रुपये, फळ पिकांसाठी 36 हजार रुपये अशा प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार आहे, परंतु नुकसान भरपाईचे वितरण करण्यापूर्वी गावातील याद्या पाठवल्या जाईल व त्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे गरजेचे आहे व त्यानंतर निधीचे वितरण खात्यात केले जाईल.