गेल्या काही आठवड्यांपासून राज्यांमध्ये पावसाचे वातावरण होते राज्यातील पावसाचे वातावरण सध्याच्या स्थितीमध्ये निवळलेले आहे परंतु, महाराष्ट्राच्या शेजारी असलेला तेलंगणा राज्य अवकाळी पावसाने त्रस्त झालेला आहे कारण अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होताना दिसते अशा वेळेस शेतकऱ्यांना मात्र एक प्रकारची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
तेलंगणातील विविध शेती पिकांचे त्यामध्ये आंबा सारख्या विविध पिकांचा समावेश आहे त्यात 50 हजार एकर वरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसते. नुकसानी मध्ये तेलंगणातील विविध जिल्ह्यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले असल्याने शेतकरी मात्र चिंता तूर झालेला आहे.
तेलंगणातील शेतकऱ्यांन अंतर्गत नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे त्यामध्ये विविध पिकांना नुकसान भरपाई मागितली जात आहे व त्यात फळबाग पिकांसाठी 40 हजार रुपये प्रति एकर प्रमाणे नुकसान भरपाई मागितली जात आहे. मका पिकासाठी वीस हजार रुपये एकर एवढी नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
तेलंगणा राज्यातील सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये दिले जाणार आहे त्यामुळे तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये थोड्या प्रमाणात आनंदाचे वातावरण बघायला मिळते कारण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या नुकसान भरपाईमुळे निघाले जाऊ शकते.
खरीप हंगाम 2024 च्या कापूस बियाण्याच्या किमती जाहीर, केंद्रीय कृषी मंत्रालयाने केल्या किमती निश्चित